
पुणे : ग्रामीण भागातील पात्र व्यक्ती केवळ सक्षम पुराव्याअभावी कोरोना लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी मतदार यादीचा आधार घेतला जाणार आहे. यासाठी लोकसभा, विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांचा आधार घेण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामसेवकांना दिला आहे. मतदारयादीत नाव आणि वयाचा स्पष्ट उल्लेख असल्याने नागरिकांना आता वयाच्या पुराव्यासाठी फारशी धावपळ करावी लागणार नसल्याचे प्रसाद यांनी सांगितले. या मतदार याद्यांच्या आधार घेत, आपापल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोना लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सोपे होणार आहे. अशा व्यक्तींना लसीकरण केंद्रांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या मतदारयाद्या उपयुक्त ठरणार आहेत. यामुळे संबंधित व्यक्तींना आता केवळ ओळखीचा कोणताही एक ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका आणि नगर पंचायतींचे सदस्य, अन्य सर्व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. यामुळे हे लोकप्रतिनिधी मतदार याद्यांच्या आधारे प्रत्येक पात्र व्यक्तीच्या घरी जाऊन संबंधिताला लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जात आहेत. यामुळे ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला चांगला वेग आला आहे. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ एप्रिलपासून सुरू झाला आहे. या तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षे पूर्ण असलेल्या आणि त्यापुढील वयाच्या सर्व व्यक्तींना लस देण्यात येत आहे. याबरोबरच पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेतील दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या व्यक्तींना दुसरा डोस देण्यात येत आहे.
आणखी १२६ लसीकरण केंद्र सुरु
ग्रामीण भागातील कोरोना लसीकरणाला अधिक गती देण्यासाठी आणखी १२६ लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. येत्या दोन दिवसात टप्याटप्याने ही लसीकरण केंद्र सुरू केली जाणार आहेत. पूर्वीची १७४ लसीकरण केंद्र आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील एकूण लसीकरण केंद्रांची संख्या ३०० होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.