Voter Slips : दोन लाख पुणेकरांनी घेतल्या मतदार स्लिपा; मुरलीधर मोहोळ यांच्या यंत्रणेचा नागरिकांना फायदा

‘‘निवडणूक आयोगाच्या डेटाबेसनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन मतदार स्लीप मिळविण्यासाठी आम्ही महिनाभरापूर्वीच विशेष हेल्पलाइन सुरू केली.
Voter Slips
Voter SlipsSakal

Pune News : मतदानासाठी नागरिकांच्या ‘उत्साहा’बाबत सातत्याने चर्चा होत असतानाच भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयातून आजपर्यंत दोन लाख मतदारांनी मतदार स्लीप प्राप्त केल्याची माहिती समोर येते आहे.

मोहोळ यांची उमेदवारी सर्वांत आधी जाहीर झाल्याने योग्यवेळी प्रचारयंत्रणा कार्यान्वित करता आली, असे प्रचार समन्वयक नीलेश कोंढाळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाच्या डेटाबेसनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन मतदार स्लीप मिळविण्यासाठी आम्ही महिनाभरापूर्वीच विशेष हेल्पलाइन सुरू केली.

तसेच, मतदारयादीतील नाव शोधण्यासाठी सर्व प्रचारसाहित्यावर क्यूआर कोड छापण्यात आला. पुण्यातील नागरिक मतदानासाठी उत्सुक असून मतदार स्लीप मिळविण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. हेल्पलाइनवर संपर्क करीत, कार्यालयात प्रत्यक्ष येऊन स्लीप घेऊन जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही मोठे आहे.

गेल्या ३० दिवसांत या यंत्रणेतून किमान दोन लाख नागरिकांनी स्लिपा घेतल्या आहेत.’’ मतदानास अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने आता घरोघरी जाऊन मोबाइल प्रिंटरच्या आधारे स्लीप वाटपाचे काम सुरू असून त्यासाठी दोन हजारांहून अधिक प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज काम करीत असल्याचे कोंढाळकर यांनी सांगितले. मतदार स्लिपसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात संपर्क साधणाऱ्या अनेक नागरिकांना आपले नाव यादीत नसल्याचे लक्षात येत आहे.

गेल्यावेळेस मतदान केलेल्या कोथरूडमधील सुमारे ३८ हजार मतदारांची नावे यावेळेस वगळल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक आयोगाने यादीतील नाव, छायाचित्र, पत्ता इत्यादींसंदर्भात सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी केलेल्या आवाहनांकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क गमवावा लागत आहे, अशी हळहळ राजकीय वर्तुळातून व्यक्त होते आहे. याविषयी निवडणूक आयोगाने एक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com