'पीबीए'च्या निवडणुकीचे मतदान सुरू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

निवडणूकीचा निकाल आज रात्री उशिरापर्यंत जाहीर होणार आहे. यंदा अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत.

पुणे : पुणे बार असोसिएशनची (पीबीए) वार्षिक निवडणूक आज होत असून त्यासाठीचे मतदान सुरू झाले आहे. मतदानासाठी सकाळ पासूनच वकिलांची रांग लागली आहे.

निवडणूकीचा निकाल आज रात्री उशिरापर्यंत जाहीर होणार आहे. यंदा अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. अध्यक्ष पदासाठी ऍड. सतिश मुळीक, ऍड. पांडुरंग थोरवे आणि ऍड. प्रवीण येसादे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यंदा देखील पीबीएची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली आहे. तर खजिनदार पदी ऍड. भाग्यश्री गुजर यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी ऍड. संजय भालघरे, ऍड. सचिन हिंगणेकर आणि ऍड. योगेश तुपे हे निवडणूक रिंगणात आहेत. तर, सचिव पदाच्या दोन जागांसाठी ऍड. विकास बाबर, ऍड.घनश्‍याम दराडे, ऍड. निलेश निढाळकर आणि ऍड. पीयुष राठी यांच्यात लढत होणार आहे.

स्वच्छता, जलसाक्षरता आणि गांधीविचार

हिशेब तपासणीस पदासाठी ऍड. ओंकार चव्हाण आणि ऍड. गणेश म्हस्के यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. गिरीश शेडगे हे काम पाहत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting for PBA elections begins

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: