

वडूज पंचायत समिती अन् लायन्स क्लबमध्ये लवकरच सामंजस्य करार
वडूज, ता. २० : खटाव पंचायत समिती व लायन्स क्लब इंटरनॅशनल यांची विविध उपक्रमांबाबत आढावा बैठक झाली. पंचायत समिती आणि लायन्स क्लब यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
यावेळी लायन्सचे उपप्रांतपाल मंगेश जोशी, राजेंद्र मोहिते, विभागीय अध्यक्ष महेंद्र कदम, रणजित निंबाळकर, डी. वाय. पाटील, बाळासाहेब शिरकांडे, रावसाहेब भोकरे, गटविकास अधिकारी योगेश कदम, उपगटविकास अधिकारी श्री. दळवी, सभापती वंदना दुबळे, उपसभापती रेश्मा शेडगे, सदस्य मनोज देशमुख, डॉ. प्रगती कोकाटे, शशिकांत रोमन, हणमंत बोटे, महेश वाघ, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लायन्स क्लब इंटरनॅशनल ही संस्था संपूर्ण जगभरात सामाजिक सेवेमध्ये अग्रगण्य म्हणून कार्यरत आहे. तालुक्यात लायन्सच्या माध्यमातून आरोग्य, पाणी, स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन तसेच पंचायत समितीच्या गरजेनुसार विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पंचायत समिती आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्यामध्ये लवकरच सामंजस्य करारनामा करण्याचे निश्चित करण्यात आले. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून तालुक्यातील विविध सामाजिक गरजा ओळखून त्यावर लायन्स इंटरनॅशनलच्या सहकार्याने ठोस आणि दीर्घकालीन स्वरूपाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पंचायत समिती आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
6B00661
वडूज : पंचायत समितीमध्ये बैठकीप्रसंगी लायन्सचे पदाधिकारी व मान्यवर.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.