मावळ तालुका कॉंग्रेसला खिंडार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

वडगाव मावळ - मावळ तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, शहराध्यक्ष किसनराव वहिले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी बुधवारी आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची बाजू बळकट झाल्याचे मानले जात आहे. 

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक असलेल्या ढोरे यांनी नुकताच कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची भूमिका अयोग्य आहे व शहरात पक्षाने विश्‍वासार्हता गमाविल्याची कारणे त्यांनी राजीनामा पत्रात दिली होती. बुधवारी सकाळी येथील ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिरात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्यासह कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किसनराव वहिले, दिलीप म्हाळसकर, शेखर वहिले आदी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले व पक्षात योग्य तो मानसन्मान राखण्याचे आश्‍वासन दिले. या प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे, तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, संत तुकाराम कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर, माजी नगरसेवक गणेश भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले, माजी उपसभापती प्रवीण चव्हाण, शहराध्यक्ष सोमनाथ ढोरे, नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, अनंता कुडे, किरण भिलारे, ऍड. दामोदर भंडारी, महेंद्र म्हाळसकर, नारायण ढोरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: wadgaon maval congress politics