वडगाव निंबाळकर येथे एफडीएची कारवाई

वडगाव निंबाळकर येथे
एफडीएची कारवाई
Published on

वडगाव निंबाळकर, ता. २१ : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) परिसरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने तसेच विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २१) तपासणी केली. या कारवाईत दोन दुकानदारांना दंड करण्यात आला असून, आवश्यक कागदपत्रे व नियमांचे पालन न करणाऱ्या इतर व्यावसायिकांना नोटिस बजावण्यात आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी संदीप शिंदे यांनी दिली.
तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी विविध हॉटेल्स व खाद्यपदार्थांच्या दुकानांना भेटी देऊन अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना तसेच ग्राहकांना देण्यात येणाऱ्या पाण्याची पाहणी केली. दोष आढळलेल्या दोन मिठाई विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
निरा-बारामती मार्गावरील दहा फाटा परिसरात खवा तयार करणाऱ्या ठिकाणीही अधिकाऱ्यांनी तपासणी केली. खवा तयार करण्यासाठी दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती, उत्पादनाची पद्धत आणि विक्री व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात आली. संबंधित व्यावसायिकाला नोटीस बजावून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरातील काही हॉटेल्स व खाद्यपदार्थांची दुकाने दुपारनंतर बंद असल्याचे दिसून आले. तपासणीदरम्यान हेल्थ सर्टिफिकेट, फूड लायसन्स आदी कागदपत्रांची मागणी करण्यात आली. काही दुकानदारांकडे केवळ शॉप ॲक्ट व उद्योग आधारची कागदपत्रे असल्याचे निदर्शनास आले. फूड लायसन्स नसलेल्या व्यावसायिकांना नोटिस देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com