

Wagholi Accident: Three Youths Killed in Car-Truck Collision
esakal
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली परिसरात मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. कटकेवाडी जवळ वोक्सवॅगन पोलो कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा