
वाघोली: वाघेश्वर मंदिर परिसराचं सुशोभिकरण; सेल्फी पॉईंट बुधवारपासून सुरू
वाघोली : वाघोलीतील वाघेश्वर मंदिर परिसरात महामार्गालगत सुशोभीकरण करण्यात आले आहे. नुकतेच आय लव्ह वाघोली हे विद्युत रोषणाईतील नाव उभारण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा बुधवारी आहे. यामुळे हा सेल्फी पॉईंट आकर्षण ठरणार आहे.
हेही वाचा: डी.एल.एड अभ्यासक्रमाचा प्रवेश अर्ज भरण्यासाठी २९ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
तळ्याभोवती भिंत, महामार्गालगत सुशोभीकरण करण्यात आल्याने वाघेश्वर मंदिर परिसर सौंदर्याने नटले आहे. महामार्गावरून जाणारे इथे आकर्षित झाल्या शिवाय राहणार नाही. तत्कालीन उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी स्वखर्चातून आय लव्ह वाघोली व शिव शंभो ही विद्युत रोषणाईतील दोन नावे उभारली आहे. सुशोभीकरणही त्यांनी स्वखर्चाने केले आहे.
हेही वाचा: पुण्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा;पाहा व्हिडिओ
"सुशोभीकरणाने मंदिराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. मात्र तळ्याभोवती असणाऱ्या कमी उंचीच्या भिंती मुळे तळ्यात तोल जाऊन पडण्याचा धोका आहे. या भिंतीवर पी एम आर डी ए ने संरक्षित जाळी तातडीने उभारावी".- राजेंद्र सातव, माजी उपसरपंच, वाघोली.
"स्वखर्चातून मी हा सेल्फी पॉईंट तयार केला आहे. सुशोभीकरण ही स्वखर्चातून केले आहे. भिंतीवर संरक्षित जाळी उभारण्याचे काम उद्यापर्यंत पूर्ण होईल. 25 तारखेला लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. हा सेल्फी पॉईंट वाघोलीकरासह महामार्गावरून जाणाऱ्यांना नक्कीच आकर्षित करेल." - महेंद्र भाडळे, तत्कालीन उपसरपंच, वाघोली.
Web Title: Wagholi Beautification Vagheshwar Temple Highway Selfie Point Starting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..