आम्हाला फक्त वाघोलीचा विकास हवा. तो ही लवकर; नागरिकांची भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wagholi Meeting

फुरसुंगी-देवाची उरुळी स्वतंत्र नगरपालिका करण्याची घोषणा झाल्यावर वाघोलीकरांच्या मनातही स्वतंत्र नगर पालिकेचा मुद्दा उपस्थित झाला.

Wagholi : आम्हाला फक्त वाघोलीचा विकास हवा. तो ही लवकर; नागरिकांची भूमिका

वाघोली - फुरसुंगी - देवाची उरुळी स्वतंत्र नगरपालिका करण्याची घोषणा झाल्यावर वाघोलीकरांच्या मनातही स्वतंत्र नगर पालिकेचा मुद्दा उपस्थित झाला. स्वतंत्र नगर पालिका व्हावी की महापालिकेतच असावे याबाबत बैठकही झाली. आम्हाला विकास हवा. तो ही लवकर. अशीच भूमिका नागरिकांची दिसून आली. मात्र विकास नगरपालिका की महापालिका कोणाच्या माध्यमातून चांगला होईल याबाबत संभ्रह दिसून आला. यामुळे दोघे तिघे वगळता अन्य जणांची भूमिकाही संभ्रह होती. 18 महिन्यात कोणतीही विकास कामे न झाल्याने महापालिकेवर प्रचंड नाराजी दिसून आली.

बैठकीतील नाराजीचे सूर

● ग्रामपंचायत असताना कोटींचा विकास झाला.

● महापालिकेत समावेश झाल्यापासून विकास कामे नाहीत.

● महापालिका अधिकारी सहजासहजी भेटत नाही. शिफारस घ्यावी लागते.

● जेवढा कर वसूल केला. साधी तेव्हढीही विकास कामे नाहीत.

● किरकोळ कामासाठीही खूप चकरा माराव्या लागतात.

● व्यासाने सर्वात मोठी पुणे महापालिका मात्र बजेट केवळ 9500 कोटी. कसा विकास होईल.

● पूर्वीच्या समाविष्ट गावांचा विकास नाही.

● एक दोन नगरसेवक काय विकास करणार.

● भरमसाठ कर द्यावा लागेल.

का हवी नगरपालिका

■ मिळणाऱ्या निधीतून व उत्पन्नातून विकास होईल.

■ अधिकाऱ्यांकडे हेलपाते मारण्याची गरज नाही.

■ कर मार्यदित स्वरूपात राहील.

■ नागरिकांची कामे लवकर होतील.

■ पाणी, कचरा, ड्रेनेज, वाहतूक कोंडी प्रश्नांकडे तातडीने पाहता येईल.

■ नागरिकांना हक्काने आपले प्रश्न मांडता येतील.

■ अंतर्गत रस्ते विकसित होतील.

बैठकीसाठी उपस्थिती

◆ सुमारे 200 नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी.

ठोस विरोध कोणाचा

■ आमदार अशोक पवार

■ जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके

■ मनसेचे प्रकाश जमदाडे

■ वाघोली सोसायटी असोसिएशन

(यापैकी केवळ जमदाडे यांचा प्रत्यक्ष बैठकीत उपस्तीत राहून विरोध. अन्य जणांचा पत्राद्वारे, मेसेज द्वारे)

बैठकीतील अंतिम निर्णय

■ आम्हाला विकास हवा. अजून नागरिकांची मते जाणून घेऊन त्या दृष्टीने पुढील पाऊले उचलणार.

उपस्थित कोण

● माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, माजी सरपंच वसुंधरा उबाळे, शिवदास उबाळे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव, संजय सातव, संदीप सातव, शांताराम कटके, मारुती गाडे, जयप्रकाश सातव, ज्योती पाचर्णे, सुधीर भाडळे, महेंद्र भाडळे. गणेश गोगावले, अनिल सातव, विजय जाचक.

असाही आरोप

राजकीय स्वार्थासाठी काही जण नगरपालिकेची मागणी करत असल्याचा नागरिकांचा आरोप.

वाघोलीची सध्य स्थीति

◆ लोकसंख्या - अडीच लाखांपेक्षा अधिक.

◆ ग्रहकुल सोसायटी - 100 पेक्षा अधिक

◆ मुख्य समस्या - पाणी, कचरा, ड्रेनेज, वाहतूक, पदपथ दिवे, काही अंतर्गत रस्ते.

टॅग्स :wagholiDevelopmentMeeting