Pune Crime: पुण्यात अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई; वाघोलीत तब्बल ७६ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त, राजस्थानातील दोन तस्कर गजाआड
Pune News: वाघोली परिसरात पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ७६ लाखांचा मॅफेड्रॉन जप्त केला. दोन राजस्थानमधील तस्करांना अटक करण्यात आली आहे.
पुणे : गुन्हे शाखेने वाघोली परिसरात छापा टाकून तब्बल ३५१ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या अमली पदार्थाची बाजारभावानुसार सुमारे ७६ लाख एक हजार ७१० रुपये एवढी किंमत असून, दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे.