
वाघोलीतील प्लॅस्टिक मालाच्या गोडाऊनला भीषण आग
पुणे : प्लॅस्टिकच्या (plastic) टाकाऊ माल असणाऱ्या गोडाऊनला शनिवारी पहाटे दोन वाजता आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत गोडाऊन जळून खाक झाले. पुणे महापालिका (pune corporation) व पीएमआरडीए (PMRDA) अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. ही घटना वाघोली (wagholi) येथे घडली.
वाघोली येथील भावडी रोड परिसरात प्लॅस्टिकच्या टाकाऊ मालाचे गोडाऊन व पत्रा शेड आहे. या गोडाऊनला शनिवारी पहाटे 2 वाजता आग लागली. याबाबत पुणे मध्यवर्ती अग्निशामक नियंत्रण कक्षाला खबर मिळाली. त्यानंतर महापालिका अग्निशामक दल व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनेच्या ठिकाणी दाखल झाल्या. प्लॅस्टिकच्या टाकाऊ माल असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला.

हेही वाचा: पुण्यातील नदी संवर्धन प्रकल्प तातडीने पुर्ण करा : बापट
अग्निशामक दलाच्या जवानांना सकाळी 7 वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले, याबाबत माहिती मिळाली नाही, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाच्यावतीने देण्यात आली.
Web Title: Wagholi Fire At The Plastic Waste Godown
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..