वाघोली - येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या मैदानात उभारलेला पत्र्याचा मंडप ४.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. त्यावेळी मंडपात कार्यक्रम नसल्याने मुले नव्हती. यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. जे एस पी एम विद्यापीठाच्या सहा दिवसीय कार्यक्रमासाठी हा मंडप उभारण्यात आला होता.