

Koregaon Bhima Shaurya Diwas Preparations
Sakal
वाघोली : कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिनाच्या तयारीला वेग आला असून, परिमंडळ चारचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी करून सुरक्षेविषयी आणि व्यवस्थापनाशी संबंधित अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. परिसरातील पोलिस पाटील आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत, त्यांनी तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी उपाययोजना तपासल्या.