
वाघोली : मद्यधुंद तरुण अचानक आव्हाळवाडी रस्त्यावरील एका टॉवरवर चढला. त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. त्याला खाली येण्याची पोलिस, नागरिक व अग्निशामक कर्मचाऱ्यांनी विनंती केली. मात्र कागदपत्रे दाखविण्याचा त्याचा हट्ट होता. अर्धा तासानंतर तो स्वतःच खाली आला. त्याला पोलिसांनी ठाण्यात नेले. काही वेळाने सोडून दिल्यानंतर तो दोन तासाने पुन्हा टॉवरवर चढला. त्याला पोलिसांनी पुन्हा खाली उतरविले. सुमारे दोन ते तीन तास हा प्रकार सुरू होता. नागरिकांसाठी हे मनोरंजन तर, पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरली.