
"Solve Problems First, Then Leave": Angry Wagholi Residents Gherao Pune Municipal Commissioner Naval Kishore Ram's Car During Inspection.
Sakal
वाघोली : महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासह वाघोलीत सहा ठिकाणी सांडपाणी व्यवस्था व रस्ते या मूलभूत समस्यांची पाहणी केली. आय व्ही इस्टेट सोसायटी परिसरात पाहणी करताना नागरिकांनी त्यांच्या कारला घेराव घातला. प्रश्न सोडवा तरच जाऊ देऊ अशी भूमिका घेतली. मात्र त्यांची समजूत काढल्यावर रस्ता मोकळा केला.