Wagholi Traffic Jam: वाघोलीला अवकाळीचा फटका! भर रस्त्यात होर्डींग कोसळल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी

Wagholi Traffic Jam: पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरची रांगा लागल्या आहेत. विद्युत तारा तुटल्या असल्यामुळे दोन चारचाकीचे नुकसान झाले.
Wagholi Traffic Jam
Wagholi Traffic Jam esakal

Wagholi Traffic Jam: जोरदार वारे व पाऊसामुळे वाघोलीत  साई सत्यम पार्क परिसरात पुणे - नगर महामार्गावर होर्डींग कोसळले. यामध्ये तीन ते चार कार व दुचाकीचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. यामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक थांबली होती. परिणामता चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दीड ते दोन तासानंतर पडलेले होर्डिंग महामार्गवरून हटवण्यात यश आले.

बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे सुरू झाले. यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. वारे ही जोरदार वाहत होते. यामुळे होर्डिंग महामार्गावर कोसळले. तेथे उभी असलेली विजय वागस्कर यांची कार या हॉर्डींग खाली सापडली. तिचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

वागस्कर हे मित्राची नवीन कार घेण्यासाठी तेथील शोरुम मध्ये गेले होते. यामुळे ते बचावले. तर तय्यबजी यांच्या मालकीच्या कारचे ही नुकसान झाले. अन्य दोन कार व दुचाकीचे यामध्ये नुकसान झाले. लोणीकंद वाहतूक विभाग, पी एम आर डी ए अग्निशमन केंद व पुणे महापालिका कर्मचारी यांनी गॅस कटरने कापून तसेच केनच्या साह्याने महामार्गावरील होर्डिंग हटविले.

यासाठी दीड ते दोन तास लागले. तो पर्यंत पुण्याकडे येणारी वाहतूक थांबली होती. यानंतर हळु हळु वाहतुक सुरू झाली. या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणचे अनधिकृत छोटे फ्लेक्स तुटून रस्त्यावर व इतरत्र पडले. बाजार तळातील दैनदिन विक्रेत्यांचेही प्रचंड नुकसान होऊन हाल झाले.

अनेक ठिकाणी महामार्गावर पाणीही साचले होते. काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. जे होर्डिंग पडले ते अधिकृत होते. अशी माहिती नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी सोमनाथ बनकर यांनी दिली. ते कमकुवत असल्याने ते पडल्याचे नागरिकांनी सांगितले. वाघोलीतील होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याचा आरोपही नागरिकानी केला. (Pune Rain Update)

Wagholi Traffic Jam
TMC Manifesto 2024 : तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा घोषित; CAA, NRC अन् ममतादीदींच्या 10 मोठ्या घोषणा

सीमाभिंतीचे पत्रे वाकले-

खराडीतील जुना जकातनाका परिसरात एका बांधकाम साईटच्या सिमाभितीचे पत्रे वाकले. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळा झाला.

लोहगाव रोड वर झाड उन्मळले-

लोहगाव रोड वर रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर सुमारे दीड सुरू असलेल्या पावसात काही वेळ गारांचा पाऊस पडला. या गारा गोळा करण्याचा आनंद नागरिकांनी लुटला

होर्डिंग पडुन काही कार व दुचाकी नुकसान झाले आहे. नुकसान झालेला कार चालक तक्रार देण्यासाठी आले आहेत

- कैलास करे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे.

Wagholi Traffic Jam
पुण्यात गोळीबाराच्या घटना सुरुच... सुरक्षा रक्षक पुरविण्यावरून एकावर गोळीबार तर व्यावसायिकाच्या मुलावर रोखले पिस्तूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com