wagholi unseasonal rain update weather forecast
wagholi unseasonal rain update weather forecastSakal

Wagholi Rain Update : पाऊण तासाच्या अवकाळी पावसाने वाघोलीची दैना

मंगळवारी सायंकाळी पडलेल्या पाऊण तासाच्या अवकाळी पावसाने वाघोलीची दैना उडाली. भावडी रोडला नदीचे स्वरूप आले.
Published on

Wagholi News : मंगळवारी सायंकाळी पडलेल्या पाऊण तासाच्या अवकाळी पावसाने वाघोलीची दैना उडाली. भावडी रोडला नदीचे स्वरूप आले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या कमानी, बोर्ड तुटले तर अनेक होर्डींगच्या फ्लेक्सचे कापड फाटून इतरत उडाले. पुणे नगर महामार्गालगतही काही ठिकाणी पाणी साचले.

मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले. यानंतर काही वेळाने पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोरही वाढला. वाऱ्याचे प्रमाण ही अती होते. सुमारे पाऊण तासाच्या पावसाने भावडी रोडला अक्षरशः नदीचे स्वरूप आले.

या पाण्यातून वाट काढत त्या भागातील नागरिकांना जावे लागले. बुधवारी सुद्धा या रस्त्याला नदीचे स्वरूप होते. जोरदार वाऱ्यामुळे रोडला लावलेल्या लोखंडी कमानी ही तुटल्या. अनेक ठिकाणचे बोर्ड वाकले. विद्युत पोल व मिळेल त्या जागी लावलेल्या फ्लेक्स तुटून पडले.

मोठ्या होर्डिंगला लावलेया फ्लेक्सचे कापड फाटून ते इतरत्र पडले. या पावसाने विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. पुणे नगर महामार्गालगत काही ठिकाणी पाणी साचले होते. अनधिकृत फ्लेक्सचे जाळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. अवकाळी पाऊण तासाच्या पावसाने वाघोलीची ही दैना झाली तर पावसाळ्यात काय स्थिती होईल हे सांगणेच कठीण आहे. असा नागरिकांचा सुर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com