Vaccination: लस न घेता PM मोदींच्या फोटोसह मिळाले सर्टिफिकेट

Vaccination: लस न घेता PM मोदींच्या फोटोसह मिळाले सर्टिफिकेट

किरकटवाडी (पुणे) : ''लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेले होते. सकाळपासूनच पानशेत (ता.वेल्हे) येथील लसीकरण केंद्रासमोर पत्नीसह रंगेत उभा होतो. माझ्यासह पानशेत परिसरातील इतर अनेक वयोवृद्ध लसीकरणासाठी ताटकळत उभे होते. बाहेरील लोक मोठमोठ्या महागड्या गाड्यांमध्ये येऊन लस घेऊन जात होते. लसीकरण केंद्रात असलेल्या डॉक्टरांना अनेक वेळा विनंती केली,पण लस संपली आहे. तुम्ही थांबू नका. तुम्हाला लस मिळणार नाही, अशाप्रकारे उद्धट उत्तरे आम्हाला मिळत होती. शेवटी दिवसभर उपाशी पोटी थांबून कंटाळून लस न मिळाल्यामुळे निराश होऊन दोघेही घरी आलो. घरी आल्यावर रात्रीचे जेवण केल्यानंतर मोबाईलवरील मेसेज पाहिला व धक्का बसला. माझे यशस्वीपणे लसीकरण झालेले असल्याचे मोदींचा फोटो असलेले प्रमाणपत्र त्यामध्ये दिसत होते.''

Vaccination: लस न घेता PM मोदींच्या फोटोसह मिळाले सर्टिफिकेट
कुकडी प्रकल्पाच्या उन्हाळी आवर्तनाला स्थगिती

सध्या धायरी येथे राहणारे परंतु मूळचे अंबेड(ता.वेल्हे) येथील रहिवासी राजाराम पासलकर (वय 53) यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड अशी सर्व महत्त्वाची कागदपत्रे अंबेड गावच्या पत्त्यावरची असल्याने लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना पानशेत केंद्र मिळाले. 5 मे रोजीची दुपारी 3 ते सायंकाळी 6 ही वेळ राजाराम पासलकर आणि त्यांच्या पत्नीला लसीकरणासाठी मिळाली. त्यानुसार लवकर नंबर लागावा म्हणून पत्नीसह राजाराम पासलकर सकाळपासूनच लसीकरणासाठी पानशेत येथे जाऊन थांबले.

Vaccination: लस न घेता PM मोदींच्या फोटोसह मिळाले सर्टिफिकेट
एक बर्थडे सेलिब्रेशन असंही! 3 व्हेंटिलेटर्ससह 22 लाखांची मदत

राजाराम पासलकर व त्यांच्या पत्नी यांच्यासह पानशेत परिसरातील विविध गावांमधील अनेक ज्येष्ठ नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी रांगेत थांबलेले होते. दिवसभर थांबूनही राजाराम पासलकर व त्यांच्या पत्नीला लस मिळाली नाही. लस संपली आहे असे कारण डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. ''काही लोक मात्र चार चाकी गाड्यांमध्ये येऊन रांगेत न थांबता लस घेऊन जात होते, आम्ही विचारणा केली तर लसीकरण केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आमच्याशी उद्धटपणे बोलत होते'' असाही आरोप पासलकर यांनी केला आहे. शेवटी वैतागून पासलकर व त्यांची पत्नी लस न मिळाल्याने घरी निघून आले. घरी आल्यावर मात्र गायकवाड एन.डी. यांच्याकडून लसीकरण यशस्वीपणे झाल्याचे मोदींचा फोटो असलेले प्रमाणपत्र पाहून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात राजाराम पासलकर यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत वेल्हे तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अंबादास देवकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतू संपर्क होऊ शकला नाही.

Vaccination: लस न घेता PM मोदींच्या फोटोसह मिळाले सर्टिफिकेट
'आज लसीचा दुसरा डोस फक्त दिला जाणार', उस्मानाबादमध्ये आरोग्य केंद्रावर लागले फलक

"ज्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यांचे लसीकरण संबंधित मिळालेल्या केंद्रांवरून सुरू आहे. पासलकर यांच्या बाबतीत नेमकी काय अडचण आली त्याबाबत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल."

- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

Vaccination: लस न घेता PM मोदींच्या फोटोसह मिळाले सर्टिफिकेट
'आज लसीचा दुसरा डोस फक्त दिला जाणार', उस्मानाबादमध्ये आरोग्य केंद्रावर लागले फलक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com