esakal | 'आज लसीचा दुसरा डोस फक्त दिला जाणार', उस्मानाबादमध्ये आरोग्य केंद्रावर लागले फलक
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

'आज लसीचा दुसरा डोस फक्त दिला जाणार', उस्मानाबादमध्ये आरोग्य केंद्रावर लागले फलक

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद: लसीकरणाची मोहीम लसीअभावी (corona vaccination) थंड पडल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे, तर दुसऱ्या बाजुला प्रशासनाला लसीबाबत विचारणा होऊ लागल्याने तेही लसीबाबत माहिती देताना कंटाळून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहातील एका लसीकरणाच्या केंद्रावर तेथील अधिकाऱ्यांनी एक बोर्ड लावला आहे. या बोर्डवरील मजकुर वाचून कोणाच्याही मनात प्रशासनाची हतबलता लक्षात येऊ शकेल अशी स्थिती आहे.

कोवॅक्सीन (covaxin) लस उपलब्ध नाही, ती कधी होईल माहिती नाही असा थेट मजकुर लिहुन अधिकाऱ्यांनी लोकांच्या प्रश्नापासून काहीवेळ दूर राहण्याचा हा मार्ग निवडल्याचे दिसून आले. शिवाय कोवीशिल्ड लसीचाही दुसरा डोस मिळणार असून पहिला डोस घेणाऱ्यांनी विनाकारण रांगेत उभा राहू नये असा सल्ला त्यांनी सुचना फलकावर दिला आहे. लोकांना आता लसीचे महत्त्व पटल्याने ते गर्दी करताना दिसत आहे, मात्र प्रशासनाला लसीचा पुरवठा होत नसल्याने त्यांची अडचण होऊ लागली आहे.

हेही वाचा: Osmanabad Lockdown: जिल्ह्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर; जाणून घ्या कोणत्या सुविधा सुरू राहतील

लसीकरण केंद्रावर रांग लागलेल्या पाहयला मिळतात, काहीना लस मिळते. पण अनेकांनी रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र आहे. अशावेळी प्रशासन देखील हतबल झाल्याचे दिसत आहे, प्रशासनाला प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग सुध्दा ओढावू लागले आहेत. प्रशासन मात्र त्यांच्या प्रश्नाला उत्तर व ही परिस्थिती हातळताना मेटाकुटीला येऊन गेले आहे. लसीचा पुरवठाच होत नसल्याने प्रशासनाने तरी काय करावे असा सवाल त्यांच्याकडून केला जाऊ लागला आहे. आलेल्या साठा एक दोन दिवसात संपत असून त्यातही दुसऱ्या डोसला अधिक प्राधान्य दिले जात आहे.

हेही वाचा: 'मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाप्रश्नी पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे बोट दाखवू नये'

साहजिकच अगोदर डोस घेतलेल्या दुसरा डोस मिळणे आवश्यक आहे. मात्र येथे पहिलाच डोस घेण्यासाठी लोक अगदी सकाळपासुन रांगेत उभा राहून लसी मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. अनेकदा लसीकरण केंद्रावर आल्यावर समजते की, लसच शिल्लक नाही. ही परिस्थिती उस्मानाबाद शहातीलच नाही, तर ग्रामीण आरोग्य केंद्रावर पण तशीच स्थिती आहे. त्यामुळेच उस्मानाबादच्या केंद्रावर प्रशासनाने लोकासमोर हात टेकल्याचे दिसुन येत आहे. त्यानी चक्क सुचना फलकाचा आधार घेऊन त्यावरच सुचना लिहल्याचे दिसून येत आहे.