लॉकडाउन शिथिलतेनंतर उद्योगांची परिस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

लॉकडाउन शिथिलतेनंतर उद्योगांची उत्पादन क्षमता ५५ टक्‍क्‍यांवर, तर मनुष्यबळ उपस्थितीचे प्रमाण ६७ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे, असे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. उद्योगांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी ३ ते ९ महिन्यांचा कालावधी लागेल, असे ५५ टक्के उद्योगांचे म्हणणे आहे.

पुणे - लॉकडाउन शिथिलतेनंतर उद्योगांची उत्पादन क्षमता ५५ टक्‍क्‍यांवर, तर मनुष्यबळ उपस्थितीचे प्रमाण ६७ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे, असे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. उद्योगांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी ३ ते ९ महिन्यांचा कालावधी लागेल, असे ५५ टक्के उद्योगांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमध्ये उद्योगांच्या स्थितीबाबत सहाव्यांदा सर्वेक्षण केले आहे. त्यात पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील १५० उद्योगांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यातून उत्पादन क्षेत्राची परिस्थिती ऑगस्टच्या तुलनेत काही प्रमाणात सुधारली असून मनुष्यबळाची उपलब्धता वाढल्याचे दिसून आले आहे. या उद्योगांत सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे प्रत्येकी प्रमाण ३३ टक्के, तर मध्यम आणि मोठ्या उद्योगांचे प्रमाण प्रत्येकी १७ टक्के आहे. उत्पादन क्षेत्रातील ६३ टक्के, सेवा क्षेत्रातील २४ टक्के तर, दोन्ही क्षेत्रांत कार्यरत असलेल्या १३ टक्के उद्योगांचा त्यात समावेश आहे. 

MPSC परीक्षा स्थगित करा अन्यथा...; मराठी क्रांती मोर्चानं काय दिलाय इशारा?

जुलै महिन्यात उद्योग सुरू झाल्यावर कोरोनाच्या पूर्वीच्या काळाशी तुलना केली असता, उत्पादन आणि मनुष्यबळाची उपलब्धता या दोन्हींवर विपरीत परिणाम झाला होता असे दिसून आले. मात्र, त्यानंतरच्या दोन महिन्यांत परिस्थितीत थोडीफार सुधारणा झाली आहे. कोरोनाच्या पूर्वीच्या काळासारखी उद्योगांची स्थिती होण्यासाठी ३ ते ९ महिन्यांचा कालावधी लागेल, असे ५५ टक्के उद्योजकांचे म्हणणे आहे तर, पुढील तीन महिन्यांत उद्योगांच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा २२ टक्के उद्योगांना आहे. २४ टक्के उद्योगांनी या परिस्थितीमध्ये कधी सुधारणा होईल, यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

मेट्रो खोदकामातील रसायनमिश्रित पाणी सोडलं कॅनॉलमध्ये; कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी कारवाईची मागणी

सूक्ष्म उद्योग अडचणीतच 
देशात सुमारे ६ कोटी ३० लाख सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांची संख्या आहे. त्यातील ८० टक्के उद्योग सूक्ष्म आहेत. ज्या उद्योगांत एक कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक आहे आणि ज्यांची उलाढाल पाच कोटींपेक्षा कमी आहे, अशा उद्योगांना सूक्ष्म उद्योग म्हटले जाते. त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचेच दिसून आले आहे. पिशव्या, उदबत्ती, खडू, तसेच यंत्रांचे छोटे सुटे भाग, प्लॅस्टिकच्या खुर्च्या तयार करणे आदींचा समावेश या उद्योगांत होतो. तुलनेने अन्य उद्योगांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा होतो. त्यामुळे त्यांची परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. परंतु, सूक्ष्म उद्योगांपुढे वित्त पुरवठा ही अडचण असल्याने त्यांची परिस्थिती सुधारण्यावर मोठी मर्यादा आली असल्याचे चेंबरच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

कांबळेने मित्राच्या मदतीने केला मारटकर याचा खून; चौघांची पोलिस कोठडीत रवानगी

उत्पादन आणि मनुष्यबळाची उपलब्धता वाढत आहे. उद्योगांना चांगली परिस्थिती निर्माण होण्यासाठी वर्षअखेर उजाडेल असे वाटते. परंतु कोरोनाची तीव्रता वाढल्यास मार्चपर्यंत कालावधी लागेल. 
- सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for the industry to improve after the lockdown