
Toll Plaza : टोल माफी नको,टोल नाका हटवा संघर्ष समितीचा नारा
नसरापूर : टोलनाका खेडशिवापूर येथुन हटवण्यासाठी केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाचे काय झाले प्रस्ताव तातडीने मंजुर करुन घ्या टोल हटवण्यासाठी गंभीर अंदोलन सुरु होईल असा इशारा देत टोलनाका हटाव संघर्ष समितीने टोलमाफी नको टोलनाका हटाव असा नारा देत नव्याने संर्घर्षाला सुरुवात केली आहे सोमवारी संघर्ष समितीच्या वतीने सर्वपक्षीय कार्यकर्ते महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन निवेदन देणार असुन टोल हटवण्याची मागणी करणार आहेत.
एक फेब्रुवारी पासुन खेड शिवापुर टोलनाक्यावर व्यवस्थापनाने सक्तीने टोलवसुली चालु केली असुन स्थानीकांवर दादागिरी करत टोल वसुली केली जात आहे या पार्श्वभुमीवर टोलनाका हटाव संघर्ष समितीची बैठक आज नसरापूर येथे पार पडली
यावेळी संघर्ष समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर माऊली दारवटकर,डॉ संजय जगताप,रोहन बाठे,लहुनाना शेलार,विलास बोरगे,जीवन कोंडे,ज्ञानेश्वर शिंदे,आदित्य बोरगे,अमोल पांगारे, गोरख मानकर,महेश धाडवे,विजय जंगम,अरविंद सोंडकर,दादा आंबवले,राहुल पवार,शिवराज शेंडकर,राजेंद्र कदम,सचिन बदक,ज्ञानेश्वर पांगारे आदि सर्व पक्षिय कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संघर्ष समितीच्या मागील कामाचा माऊली दारवटकर यांनी अढावा घेतला मागील अंदोलनाच्या वेळी महामार्ग प्राधिकरण व टोलनाका व्यवस्थापन जो पर्यंत टोल हटवण्या बाबत केंद्रस्तरावर काही निर्णय होत नाही
तो पर्यंत एम एच 12 व एम एच 14 क्रमांकाच्या वाहनांना टोल मध्ये सुट दिली जाणार असल्याचे लेखी अश्वासन दिले होते मात्र टोलहटवण्या बाबत अद्याप काही निर्णय झाला नसताना स्थानिक वाहनांना जबरदस्तीने टोल वसुली केली जात आहे संघर्ष समिती या बाबत गप्प बसणार ऩसुन नव्याने आंदोलन उभे केले जाईल असे सांगितले
डॉ जगताप यांनी फास्टटँग मधुन तसेच गाडीच्या नंबर वरुन देखिल वसुली केली जात आहे हे पुर्णपणे बेकायदेशिर आहे नागरीकांनी टोल न देता व्यवस्थापनाला कायदेशीर अव्हान दिले पाहीजे ते होत नाही म्हणुन व्यवस्थापनाची दादागीरी वाढत आहे असे मत व्यक्त केले.
जीवन कोंडे यांनी आता यापुढे गांधीगिरीने आंदोलन न करता तोडफोड करुनच टोल हटवला गेला पाहीजे असे मत व्यक्त केले या वेळी उपस्थित सर्वांनी चर्चेत सहभागी होत शेवटी टोलनाका हटवण्याच्या प्रस्तावा बाबत प्राधिकरणाचा पाठपुरावा काय झाला
केंद्रीय पातळीवर मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निर्णय कधी होणार या बाबत जाब विचारुन तो पर्यंत टोलवसुली बंद करा असे निवेदन सोमवारी ता.13 रोजी महामार्ग प्राधिकरणाच्या वारजे येथील कार्यालयात देण्यात येणार असुन त्या ठिकाणीच पुढील अंदोलनाचा इशारा देण्याचा निर्णयसमितीच्या बैठकीत घेण्यात आला,लहुनाना शेलार यांनी अभार मानले.
राष्ट्रवादीची अनुपस्थिती-
टोलनाका संघर्ष समितीच्या या बैठकीची माहीती भोर वेल्हे तालुक्यात सर्व ठिकाणी देण्यात आली होती त्या नुसार सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणीह कार्यकर्ते या बेठकीस उपस्थित नव्हते या बद्दल उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली