Wakad Accident: मद्यधुंद बसचालकामुळे आणखी एक अपघात; वाकड पुलावरील घटना, कारचालक जखमी
Drunk Bus Driver: वाकड पुलावर मद्यधुंद खासगी बसचालकाने विरुद्ध दिशेने येत कार आणि रिक्षाला धडक देत कारचालकाला गंभीर जखमी केले. हिंजवडी परिसरात दोन दिवसांत दुसरा अपघात; मद्यधुंद चालकांच्या मुजोरपणावर नागरिकांची संतापाची लाट.
वाकड : खासगी बसच्या मद्यधुंद चालकाने विरुद्ध दिशेने येत मोटार आणि रिक्षाला धडक दिली. यात कारचालक जखमी झाला. तर, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता.४) मध्यरात्री हा अपघात वाकड पुलावर झाला.