
शिवाजीनगर : वाकडेवाडी येथील पीएमसी वसाहतीतील इमारतींची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. देखभालअभावी आणि दुरुस्तीअभावी येथील नऊ इमारती पूर्णपणे धोकादायक झाल्या आहेत. या वसाहतीत सुमारे १६०० रहिवासी राहत असून, त्यांचा जीव धोक्याच्या छायेखाली गेला आहे. इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाही पुणे महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब संतापजनक आहे.