Kasba Bypoll Result : "कसबा तो झाकी है, कोथरूड..." ; फ्लेक्सबाजी करत चंद्रकांत पाटलांना डिवचलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

Kasba Bypoll Result : "कसबा तो झाकी है, कोथरूड..." ; फ्लेक्सबाजी करत चंद्रकांत पाटलांना डिवचलं!

पुणे : उद्या चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीची मतमोजणी आहे. सकाळ ७ वाजेपासून या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. कसबा - चिंचवड दोन्ही मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सर्व पक्षांनी मोठी ताकद दोन्ही मतदार संंघात लावली आहे. त्यामुळे भाजप जिंकणार की महाविकास आघाडी, हे उद्या स्पष्ट होणार आहे. 

मात्र निकालाआधीच कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे फ्लेक्स लागले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. "Who is Dhangekar? कसबा तो झाकी है, कोथरूड अभी बाकी है" अशा मजकुराचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

Who is Dhangekar? असा सवाल भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भर सभेत विचारला होता. त्यामुळे त्यांना डिवचण्यासाठी हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. उद्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आहे आणि याच पार्श्वभूमीवर धंगेकर यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स लावण्यात आले आहेत. 

एक्झिट पोल काय सांगतो?

द स्ट्रेलेमा संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार चिचवडमध्ये भाजपला जागा राखण्यात यश मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला १ लाख ५ हजार ३५४ मते मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना ९३ हजार आणि राहुल कलाटे यांना ६० हजार १७३ मते मिळण्याचा अंदाज आहे.

दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठमध्ये रवींद्र धंगेकर विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून धंगेकर यांना ७४ हजार ४२८ मते मिळू शकतात. तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ५९ हजार ३५१ मते मिळण्याचा अंदाज आहे.