'जीसॅट'च्या मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचा सहभाग

राजकुमार थोरात
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

वालचंदनगर (पुणे) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीएसएलव्ही- एफ 11/जीसॅट -7 ए या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. यामध्ये वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीचा सहभाग असून यशस्वी प्रक्षेपणामुळे वालचंदनगर कंपनीच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लई यांनी दिली.

या मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचा ही मोलाचा सहभाग असून कंपनीने या मोहिमेसाठी रॉकेटच्या मोटर केसिंग, हेड अँड सेगमेंट, नोझल अँड सेगमेंट ही महत्त्वाची उपकरणे तयार केली आहेत. याचा उपयोग मोहिमेच्या पहिल्या स्टेजमध्ये केला जातो. मंगळवारी (ता. 19) दुपारी इस्रोच्या उपग्रहाने यशस्वी उड्डाण केले. या उपग्रहामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. जीसॅट-7 ए हा लष्कराचा 39 वा दळणवळण उपग्रह आहे. यामध्ये चार सोलर पॅनेल बसवण्यात आले आहेत. त्यातून जवळपास 3.3 किलोवॉट विजेची निर्मिती केली जाणार आहे. तसेच हवाई दलाचे तळ जोडण्याइतकेच जीसॅट-7 ए चे कार्य मर्यादित नसून हवाई दलाच्या ड्रोन मोहिमांमध्येही मोठा फायदा होणार आहे. सध्याचे हवाई दलाचे जमिनीवरील नियंत्रण कक्ष उपग्रह केंद्रित नियंत्रण कक्षामध्ये बदलले जातील. जीसॅट-7 ए मुळे मानवरहित ड्रोन विमानांचा पल्ला, टिकण्याची क्षमता आणि लवचिकता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Walchandnagar Companys participation in issro gsat campaign