हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटीलsakal

शेतकऱ्यांचा एक रुपयाही बुडणार नाही; हर्षवर्धन पाटील यांची ग्वाही

निरवांगी येथे आयोजित केलेल्या नीरा-भिमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आयोजित केलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते

वालचंदनगर : नीरा-भिमा सहकारी साखर कारखान्याला २२ वर्षाची व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याला ३३ वर्षाची परंपरा आहे.दोन्ही कारखान्याने इतिहासामध्ये शेतकऱ्यांचा एक रुपया बुडविला नसून शेतकऱ्यांनी चिंता करु नये. चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून १९ लाख मेट्रीक टन उस गाळप करण्याचे उद्ष्ठि असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाचे एक टिपरु देखील शिल्लक ठेवणार नसल्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

निरवांगी (ता.इंदापूर) येथे आयोजित केलेल्या नीरा-भिमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आयोजित केलेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.यावेळी नीरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, संचालक राजवर्धन पाटील,दत्तू सवासे, कृष्णाजी यादव,विलास वाघमोडे,माजी सरपंच दशरथ पोळ, बाळासाहेब गायकवाड, दत्तू पोळ, शरद जाधव उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी सांगितले की,सध्या साखर कारखानदारी अडचणीमध्ये आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याने देशातील पहिला सीएनजी गॅस निर्मिती करणारा प्रकल्प उभारला आहे.

हर्षवर्धन पाटील
Nobel Prize: वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर, 'हे' आहेत मानकरी

चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये कारखान्याच्या परीसरातील २५० ट्रॅक्टर सीएनजी वरती चालणार आहेत. यामुळे वाहतुकीच्या खर्चामध्ये बचत होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकारमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नामुळे पेट्रोल मध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी मिळणार असून याचा फायदा देशाला व साखर कारखान्याला हाेणार आहे. सध्या नीरा -भिमा सहकारी साखर कारखान्याकडे ४७ कोटी लिटर इथेनॉल शिल्लक आहे. गतवर्षीच्या गळीत हंगामामध्ये गाळप कमी झाल्यामुळे कारखान्यांचा तोटा झाला. मात्र चालू वर्षी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने १२ लाख व नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याने ७ लाख मेट्रीक टन उस गाळप करण्याचे उद्ष्ठि ठेवले आहे. शेतकऱ्यांचा एकरुपयाही बुडणार नाही. शेतकऱ्यांनी दोन्ही कारखान्यास उस देवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

उसाची रिकव्हरी वाढण्यासाठी प्रयत्न करा...

सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची उसाची रिकव्हरी जास्त असल्यामुळे त्यांना जास्त दर मिळत आहेत. एक टक्का रिकव्हरी वाढल्यास सुमारे ३५० रुपये प्रतिटन उसाचा दर वाढण्यास मदत होत असल्याने साखरेचा उतारा वाढविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मदत करण्याचे आवहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com