

Walchandnagar Police seize 100 kg ganja in Kalamb raid
sakal
वालचंदनगर : वालचंदनगर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली असून गांजा तस्करी करणारी आंतरराज्य रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. शेजारील राज्यातून मोठा प्रमाणात गांजा आणून महाराष्ट्रामध्ये विकला जात आहे. आज शुक्रवार (ता.७) रोजी तेलंगानामधील हैद्राबाद हुन चारचाकी गाडीमधून गांजा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली होती. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी तातडीने इंदापूरच्या पश्चिम भागातील कळंब,वालचंदनगर व लासुर्णेमध्ये सापळा रचला.