
पुणे ः दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांत तीन वॉकिंग प्लाझा करण्याची सूचना केंद्र सरकारने देशातील सर्व महापालिकांना केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिन्स्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनी किमान एक तरी वॉकिंग प्लाझा करावा, असेही केंद्राने महापालिकेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. बाजारपेठेलगतच्या रस्त्यांवर पादचाऱयांची मोठी गर्दी असते. त्यातच वाहनांच्या कोंडीमुळे पादचाऱयांना चालणे अवघड होते. सध्याच्या काळात आर्थिक घडी सुरळीत होण्यासाठी बाजारपेठांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बाजारपेठेत चालण्यासाठी पुरेशी जागा नसल्यास सोशल डिन्स्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी होणार नाही. त्यातून नागरिकांची वर्दळ कमी झाल्यास त्याचा व्यापाऱावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे व्यापाराला मुबलक जागा उपलब्ध करून देण्यासाठी काही बाजारपेठा वाहनमुक्त करणे गरजेचे आहे, असा केंद्र सरकारचा विचार आहे.
वॉकिंग प्लाझा करता येईल, अशा तीन बाजारपेठा महापालिकेने निश्चित करायच्या आहेत. तेथील व्यापारी, दुकानदार, ग्राहक, वाहतूक पोलिस यांच्याशी महापालिकेने चर्चा करून त्यांना योजना समजावून सांगायची आहे. तसेच वॉकिंग प्लाझामध्ये रस्त्यावर पार्किंग होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्या ठिकाणी पादचाऱयांसाठी पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था करायची आहे. ते शक्य नसल्यास मोबाईल स्वच्छतागृहे तेथे तैनात करावी, असे म्हटले आहे. प्लाझाचा भाग कचरा मुक्त ठेवण्यावर महापलिकेने लक्ष द्यायचे आहे.
या प्लाझामध्ये फेरीवाले असल्यास त्यांच्यात पुरेसे अंतर ठेवता येईल, अशी त्यांची रचना हवी. तसेच पादचारी फिरू शकतील, काही वेळ कोठे थांबू शकतील, या पद्धतीने व्यवस्था करायची आहे. या प्लाझाच्या भागात सायकलस्वारांसाठी स्वतंत्र लेन निश्चित केल्यास त्यांनाही सुविधा मिळेल. तसेच त्या भागातील प्रदूषण नियंत्रीत होऊ शकेल. गरज पडल्यास महापालिका तेथील पदपथांची लांबी आणि रूंदी वाढवू शकेल. या प्लाझापर्यंत नागरिकांना पोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असेही केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने म्हटले आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
- वॉकिंग प्लाझासाठी बाजारपेठ निश्चित करायची - 30 जूनपर्यंत
- दुकानदार, ग्राहक, पोलिस आदी घटकांशी चर्चा करायची - 31 जुलैपर्यंत
- अंमलबजावणीसाठी तयारी करायची - 30 सप्टेंबरपर्यंत
- वॉकिंग प्लाझा सुरू करायचा - ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात
दुर्गाशंकर मिश्रा (सचिव, केंद्रीय घरगृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालय) - कोरोनानंतरची परिस्थिती आव्हानात्मक असेल. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत पुरेशी काळजी घेऊन आर्थिक घडी पुन्हा बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याची सुरक्षितता राखून वॉकिंग प्लाझाची संकल्पना मांडण्यात आली आहे.
पुण्यात वॉकिंग प्लाझा करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी जुनीच आहे. केंद्र सरकारच्या सूचनेची दखल घेऊन नागरिकांशी चर्चा करून, या बाबतचा निर्णय लवकरच जाहीर करू.-मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.