Video : पुण्यातील ऐतिहासिक कात्रज तलावाची संरक्षक भिंत ढासळली; घरात शिरले पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

कात्रज येथील ऐतिहासिक पेशवे तलाव पुर्ण क्षमतेने भरलेला असून संरक्षक भिंत कोसळली आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले आहे.

पुणे : कात्रज येथील ऐतिहासिक पेशवे तलाव पुर्ण क्षमतेने भरलेला असून संरक्षक भिंत कोसळली आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले आहे.

पुण्यात रात्रभर एवढा पाऊस झाला की, कात्रज येथील पेशवे तलाव पुर्णपणे भरून बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले होते. पाण्याचा प्रवाहामुळे तलावाची संरक्षक भिंत पडली. त्यामुळे स्थानिक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे खूप हाल होत आहेत.

सकाळी साधारण 6 च्या सुमाराला भिंत कोसळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली, मात्र 12 वाजेपर्यंत एकही नगरसेवक या ठिकाणी फिरकला नसल्याचा आरोप  स्थानिक नागरिक करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wall of the historic Katraj Lake collapses in Pune