esakal | इंदापुरातील एेतिहासिक तलावाची भिंत पावसामुळे कोसळली...
sakal

बोलून बातमी शोधा

indapur.jpg

इंदापूर तालुक्‍यात सोमवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस काटी येथे, तर सर्वांत कमी पाऊस भिगवणला पडला. त्यामुळे शेतातील ऊस, मका पिकांना फायदा झाला. मात्र 310 वर्षांपूर्वी शहरात बांधलेल्या भार्गवराम तलावाची भिंत या पावसामुळे पडली. 

इंदापुरातील एेतिहासिक तलावाची भिंत पावसामुळे कोसळली...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्‍यात सोमवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस काटी येथे, तर सर्वांत कमी पाऊस भिगवणला पडला. त्यामुळे शेतातील ऊस, मका पिकांना फायदा झाला. मात्र 310 वर्षांपूर्वी शहरात बांधलेल्या भार्गवराम तलावाची भिंत या पावसामुळे पडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापुरात सन 1710 मध्ये पडलेल्या दुष्काळात छत्रपती शाहू महाराज तसेच पहिले बाजीराव पेशवे यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी धाडवशीकर यांनी तलाव बांधला. येथे भार्गवराम ऋषींनी तपसाधना केल्यामुळे तलावास त्यांचे नाव देण्यात आले. हा तलाव 20 वर्षापूर्वी बंद करून त्यामध्ये भार्गवराम बगीचा व टाऊन हॉल बांधला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तलावाचा भराव जुना झाल्याने त्यास संरक्षक कुंपण बांधले होते. मात्र रात्रभर पडलेल्या पावसामुळे 30 फूट भराव खचला. नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी भरावाची पाहणी केली. भरावास लागून असलेल्या इंदापूर- अकलूज मार्गावरील जड वाहतूक बंद केली. 
 

loading image