

₹305 Crore Projects to Accelerate Growth in Ambegaon-Shirur Constituency
esakal
-डी.के.वळसे पाटील
मंचर: आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबई येथे गुरुवारी (ता.२३)राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत सिंचन, पाणीपुरवठा, धरण सुरक्षा आणि तीर्थक्षेत्र विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी ३०५ कोटी रुपये खर्चाच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.