

हेड
गोदामाचे छत
कोसळून पाच ठार
सबहेड
कोलकत्यामधील दुर्घटना,
पन्नासजण अडकल्याचा संशय
कोलकता, ता.२४ (वृत्तसंस्था) ः दक्षिण कोलकात्याच्या तारातला वाहतूक डेपोनजीक दुपारी दीडच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत अचानक कोसळून पाचजणांचा मृत्यू झाला तर अन्य ५० ते ५५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याचा संशय व्यक्त होतो आहे. यामुळे मृतांच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते. या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या तेराजणांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचे समजते. यापैकी नऊ जखमींवर एसएसकेएम येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा गोदामामध्ये सिमेंटची पोती आणण्याचे काम सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्यामध्ये कोलकता पोलिस, आपत्ती व्यवस्थापन समूह, नागरी संरक्षण आणि अग्निशामन दल आणि लष्कराचे अधिकारी देखील सहभागी झाले होते. घटनास्थळीचा राडारोडा हटविण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. गॅस कटरच्या माध्यमातून लोखंडी रॉड तोडून ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्यांची सुटका करण्यात आली. या बचाव कार्यामध्ये अंकित सिंह नामक तरुणाने महत्त्वाची भूमिका पार पाडली . त्याने जखमी कामगारांना ढिगारा हटवून बाहेर काढण्याच्या कामात मदत केली. या दुर्घटनेची माहिती मिळताच नगरविकासमंत्री अग्निमित्रा पॉल, कोलकत्याच्या महापालिका आयुक्त स्मिता पांडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या सगळ्या बचाव कार्यावर कोलकत्याचे पोलिस आयुक्त हे लक्ष ठेवून होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.