The Jejuri Wari Accident prompted an immediate emergency response from Maharashtra's health department to treat injured Warkaris.
Sakal
पुणे : आषाढी वारीदरम्यान सोमवारी सकाळी जेजुरी टोल नाक्याजवळ दिंडीत ट्रक घुसल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातातील मृत वारकऱ्यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, जेजुरी येथे तातडीने करण्यात आले. शासनामार्फत त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.