
Pune Traffic
Sakal
वारजे : वारजे परिसरातील माई मंगेशकर रुग्णालयासमोरील उड्डाण पुलाखालील रस्ता सध्या बेकायदा पार्किंग आणि अनधिकृत व्यवसायांचा अड्डा बनला आहे. या ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावलेले असूनही वाहने पार्क केली जातात. मात्र, वाहतूक विभाग याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी, रिक्षा आणि व्यावसायिक वाहने बिनधास्तपणे उभी केली जातात. त्यामुळे ही जागा रिक्षा आणि व्यावसायिक थांब्यासाठी आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.