
वारजे : वारजे भाग महानगरपालिकेत समावेश होऊन २७ वर्षांहून अधिक काळ लोटला तरी, वारजेसाठी अद्याप हक्काची आणि सुसज्ज भाजी मंडई उभारण्यात महापालिकेला यश आले नाही. यामुळे भाजी विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेलाच व्यवसाय थाटावा लागत असून, याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे.