

PMC Indifference Draws Citizens' Ire in New Ahire
Sakal
वारजे : न्यू अहिरे गावातील मुख्य रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून खचलेल्या एका चेंबरमुळे मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात दूषित पाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.