

Poor quality work, broken tiles plague the newly renovated Ramnagar Ayushman Health Center in Warje, Pune,
sakal
वारजे : वारजे भागातील रामनगर येथील बापूजीबुवा चौकात महापालिकेने सुमारे सहा-सात महिन्यांपूर्वी नूतनीकरण करून सुरू केलेले आयुष्मान आरोग्य मंदिर दवाखाना आता निकृष्ट कामाच्या तक्रारींमुळे चर्चेत आला आहे. दवाखान्याच्या पाण्याच्या टाकीचा पाइप फुटला आहे. नव्याने बसविलेली फरशी काही ठिकाणी तुटून खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना येथून चालताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.