Warje Traffic Police Takes Strict Action : वारजे वाहतूक विभागाने मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२४ वाहनचालकांवर कारवाई करून दीड लाख रुपयांचा दंड वसूल केला असून, अपघातमुक्त वारजेसाठी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वारजे : वारजे वाहतूक विभागाच्या हद्दीत वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर मंगळवारी आणि बुधवारी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ३२४ वाहनचालकांवर कारवाई करून दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.