Warkari safety : जेजुरी दुर्घटनेनंतरही प्रशासन बेफिकीर; संत तुकाराम पालखी मार्गावर अवजड वाहनांची बेधडक धाव, वारकऱ्यांच्या सुरक्षेला धोका

जेजुरीतील भीषण अपघातानंतरही पालखी मार्गावर अवजड वाहनांची बेफाम वर्दळ; वारकऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहतूक नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह
Jejuri Palkhi Accident Sant Tukaram Maharaj Palkhi Route Heavy Vehicles Pune Solapur Highway Warkari Safety Pune Traffic Police Traffic Management Latest News Maharashtra

Jejuri Palkhi Accident Sant Tukaram Maharaj Palkhi Route Heavy Vehicles Pune Solapur Highway Warkari Safety Pune Traffic Police Traffic Management Latest News Maharashtra

Sakal

Updated on

लोणी काळभोर : जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात भरधाव ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाही पुणे शहर वाहतूक विभागाने अद्याप त्यातून कोणताही धडा घेतलेला नसल्याचे चित्र संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावर पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पालखी हडपसरहून लोणी काळभोरकडे मार्गस्थ झाल्यानंतर पालखी तळावर पोहोचण्यापूर्वीच सोलापूर–पुणे महामार्गावरुन एसटी, लक्झरी बस तसेच अवजड वाहने सोलापूर बाजूकडे सोडली जात असल्याने हजारो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com