esakal | राज्यात सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलनाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Collector office

राज्यात सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे - राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा करण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास पुणे जिल्हा याच्यातर्फे जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्य सचिव व पोलीस अधीक्षक यांना दिली आहे.

पुणे जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे अध्यक्ष शिवाजी खेडकर, जिल्हा विधी संघटक संजय भुजबळ, तुषार कुटे, पुणे शहर संघटक मनीष देशपांडे, अजिंक्य जगदाळे, ज्ञानेश्वर टकले, नवनाथ कोल्हे आदींनी विविध कार्यालयात जाऊन निवेदन दिले आहे.

१ जानेवारी २०१४ रोजी केंद्रात लोकपाल कायदा मंजूर झाला, महाराष्ट्रात सक्षम लोकायुक्त कायदा होणे गरजेचे आहे मात्र राज्य सरकार या कायद्याविषयी चालढकल करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: अनधिकृत फलकांवर पालिकेच्या आकाश चिन्ह विभागाकडून कारवाई

केंद्रीय लोकपाल लोकायुक्त कायद्यातील तरतुदीनुसार लोकपाल कायदा लागू झाल्यापासून एक वर्षाच्या आत सर्व राज्यात लोकायुक्त कायदा करावा अशी तरतूद आहे. ज्या महाराष्ट्रातून लोकपाल लोकायुक्त कायद्याचे आंदोलन सुरु झाले त्या महाराष्ट्रात अजूनही लोकपालाच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा झालेला नाही. त्यासाठी अण्णा हजारे यांचा शासनाकडे सतत पाठपुरावा आहे. त्यासाठी कार्यरत असलेल्या मसुदा समितीचे काम अंतिम टप्प्यात आहे, परंतु त्यात गतिमानता दिसत नाही. सध्या विविध क्षेत्रात भ्रष्टाचार होत असून, जनता मेटाकुटीला आली आहे. केंद्र व राज्य सरकार भ्रष्टाचार रोखण्यास कमी पडले आहे. सध्याचा लोकायुक्त कायद्याने स्वायत्त नसल्याने सक्षम नाही. अशा परस्थितीत जनतेने भ्रष्टाचाराबाबत कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न आहे. त्यासाठी राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा होणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जे कायदे झाले त्यापेक्षा आता होणारा लोकायुक्त कायदा भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी उपयुक्त असणार आहे. या कायद्यासाठी न्यासतर्फे अहिंसे च्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

loading image
go to top