Burglary Reported in Warulwadi Village
नारायणगाव : वारुळवाडी येथील व्यापारी अनिकेत दत्तात्रय डोंगरे यांच्या खिडकीचे ग्रील तोडून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने व २५ तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे. चोरीची घटना आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरी झाल्याचा दुजोरा नारायणगाव पोलिसांनी दिला असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे. नक्की किती रुपयांचा ऐवज गेला ही माहिती घेण्याचे काम सुरू आहे.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.