Pune | आई कधी अनाथ होते का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वाती डिंबळे यांच्या निवारागृहात सोय झाल्यानंतर कोमेजलेल्याआजीच्या चेह-यावर आनंद बहरुन आला.

पुणे : आई कधी अनाथ होते का?

कोथरुड : ज्यांना आपण जीवापाड जपले अशा आपल्या लाडक्या मुलांची वाट पहात थकलेली एक आई कोथरुडच्या बसथांब्यावर बाडबिस्ता-यासह बेवारसपणे रहातेय, कुठे आहेत तीची मुले, नातेवाईक?. कुठे मिळेल तीला निवारा?. आपल्या आप्तांकडून विचारपूस होईल या आशेने विमनस्क अवस्थेत वाटेकडे टक लावून पहात पहुडलेली ही आजी कोण?. आई कधी अनाथ होते का? या आशयाचे भावनिक प्रश्न मांडनारी एक पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल झाली.

वीमा अधिकारी मारुती सातपुते यांनी ही पोस्ट पाहून काही मदत करता येईल का अशी विचारणा हेल्पिंग हॅन्ड सोशल फाउंडेशनच्या स्वाती डिंबळे यांच्याकडे केली. त्यांनी तत्काळ कोथरुड गाठले. बाकड्यावर पहुडलेल्या या आजीच्या अंगावर माश्या घोंगावत होत्या. केसांच्या जटा झालेल्या. अशक्तपणामुळे हालचाल करण्याचे त्राणही राहीलेले नाही अशी स्थिती होती. क्षणाचाही विचार न करता डिंबळे यांनी आजीची जबाबदारी घेतली.

हेही वाचा: रत्नागिरी : गणपतीपुळेला पर्यटकांची पसंती ‘विकेण्ड’ला

कोथरुडचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र जगताप यांनी तातडीने पत्र देवून मुलांनी सोडून दिलेल्या आईची देखभाल करण्यासाठी रीतसर परवानगी दिली. आसरा अनाथांचा हक्काचा निवारा कात्रज येथे आजींची व्यवस्था झाली. तेथे त्यांना व्यवस्थित आंघोळ घालण्यात आली. जटा झालेले केस कापण्यात आले. पोटभर जेवण व आवश्यक औषधोपचार करण्यात आले. आपुलकीची वागणूक मिळाल्याने या माऊलीचे रुप खुलले.

डिंबळे म्हणाल्या की, "कोरोनाचे कारण सांगून बेवारस रुग्णांना वृध्दाश्रमात, अनाथाश्रमात प्रवेश मिळत नव्हता. पण काही पैसे दिले की लगेच जागा मिळत होती. रुग्णांची ही दुर्दशा पाहून हे निवारागृह सुरु केले. सध्या अठरा लोक येथे रहात आहेत. या आईंना मुले असल्याने निवारागृहात आणायचे का हा प्रश्न होता. पण त्या मुलांकडे जाण्यास तयार नसल्याने त्यांची जबाबदारी पूर्णपणे मी घेतली आहे. आपल्या घरी कोणी मनोरुग्ण असेल तर घाबरून त्यांच्यावर उपचार करणे टाळू नका. मनोरुग्ण व बेवारस लोकांसाठी मदत किंवा मार्गदर्शन हवे असल्यास आम्ही हवी ती मदत नक्की करू."

हेही वाचा: बी. टेक बायोइंजिनीरिंगसाठी बेस्ट MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी

मानव कल्याण संस्थेचे लक्ष्मण चव्हाण म्हणाले की, "माझी पोस्ट व्हायरल झाल्यावर अनेक संवेदनशील लोकांच्या प्रतिक्रीया आल्या. खरे पाहिले तर कोणाबाबतीतही असे घडू नये. परंतु आर्थिक स्थिती, कुटूंबातील विसंवाद यामुळे आपल्याच माणसांना असे दुरवर लोटले जाते. या मातेच्या मुलांची माहिती मिळाली. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. त्यांच्या मुलांचे समुपदेशन केले. ते आपल्या आईला भेटायला जाणार आहेत.

डिंबळे यांनी सांगितले की, "प्रत्येक सुनेने सासूला स्वतःच्या आईप्रमाणे वागवले आणि सासूनेही आपल्या सुनेला मुलीप्रमाणे वागवले तर कोणावरही अशी वेळ येणार नाही. पुरुषानेही आई व पत्नी दोघांनाही समजून घेत कुटूंबात सुसंवाद राहील याची काळजी घ्यावी."

loading image
go to top