esakal | चंदननगर-खराडी भागात कचर्‍याचे साम्राज्य; नागरिकांकडून सफाईची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

चंदननगर-खराडी भागात कचर्‍याचे साम्राज्य; नागरिकांकडून सफाईची मागणी

चंदननगर-खराडी भागात कचर्‍याचे साम्राज्य; नागरिकांकडून सफाईची मागणी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

रामवाडी : चंदननगर भाजी मंडई येथे महापालिकेकडून लावण्यात आलेल्या स्वच्छता फलका खाली कचर्‍याचे पोती जमा झाल्याने त्या परिसरात राहणारे तसेच त्या भागातून ये -जा करणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा वेळेवर उचला जावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 'स्वच्छ पुणे - सुंदर पुणे' ही मोहीम राबवली जात आहे. पण चंदननगर खराडी रोड मातोश्री गृहरचना सोसायट्या रस्त्यावर कचर्‍याचे ढीग दिसून येत आहे. या कचर्‍याच्या उपजीविका करणारे मोकाट जनावरे कडून कचरा विखुरला जात असल्याने अर्धाच रस्त्याचा वापर वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना करावा लागत आहे. कचर्‍यामुळे चिलटे माश्यांचा प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. परिसरातील स्वच्छता वर प्रशासनाने भर दिला जावा अशी मागणी नागरिकां कडून केली जात आहे.

हेही वाचा: उच्च शिक्षणासाठी पुण्या-मुंबईपेक्षा स्थानिक महाविद्यालयात प्रवेश निश्‍चिती

छगन राठी - स्थानिक रहिवासी :

कोरोनाच्या काळात नागरिकांकडून घरातील व शारीरिक स्वच्छता राखली जात आहे तसाच पुढाकार परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी घेणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेस पोती भरून काहीजण येथे कचरा आणून टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

सोनिया अभोंनकर - आरोग्य निरीक्षक , नगररोड क्षेत्रीय कार्यालय :

परिसरातील कचरा सकाळी उचला जातो पण काहीजण रात्रीच्या वेळी रस्त्यावर कचरा टाकतात. एखादी व्यक्तीं रस्त्यावर कचरा टाकताना आढळून आल्यावर त्यांच्या वर दंडात्मक कारवाई केली जात असते.