
पुण्याला जाणार्या पाईपलाईनच्या आळंदीतील नविन पुलाजवळील व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आळंदीकरांना पाहावे लागत आहे.
आळंदी : भामा-आसखेडहून पाईपलाईनने पाणी पुण्याला नेले. एकीकडे आळंदीत पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. मात्र पुण्याला जाणार्या पाईपलाईनच्या आळंदीतील नविन पुलाजवळील व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आळंदीकरांना पाहावे लागत आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आळंदीत पिण्याच्या पाॉण्याची गैरसोय होत आहे. गेल्या वर्षभरापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. आता नियोजनशून्य कारभारामुळे दिवसाआड येणारे पाणी बेभरवशाचे झाले आहे. गेल्या आठवडाभरात पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा अनियमीत आहे. त्यामुळे आळंदीत पाण्याचे हाल कायम आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दुसरीकडे थेट भामा आसखेडहून पुण्याला पाणी नेले. मात्र या पाईपलाईनला आळंदीत व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.संध्याकाळच्या वेळी हमखास चित्र पाहायला मिळते. अाता व्हॉल्व्हला गळती आहे, की वाॅशआउटचे पाणी आळंदीकरांना कळेना. कारण पाणी ईतके स्वच्छ आहे की आळंदीकरांना पालिका पुरवत असलेले पाण्यापेक्षा हे पाणी कैकपटीने चांगले आहे.