esakal | महापालिकेकडून पैशाचा अपव्यय; चांगल्या रस्त्यावर लाखोंची उधळपट्टी

बोलून बातमी शोधा

Waste of money from Municipal Corporation on good roads
महापालिकेकडून पैशाचा अपव्यय; चांगल्या रस्त्यावर लाखोंची उधळपट्टी
sakal_logo
By
समाधान काटे

शिवाजीनगर : पुणे शहरातील प्रमुख रस्त्यापैकी अत्यंत रहदारीचा समजला जाणारा म्हणजेच गोपाळ कृष्ण गोखले म्हणजेच फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता. मागील पाच ते सहा वर्षात या रस्त्यावर काम झाले नाही. दरम्यान, पदपथ नुतनीकरण करण्यात आल्याने रस्त्यावरील पहिला थर काढून नवीन डांबरी रस्ता गरवारे सर्कल ते कृषी महाविद्यालय हा बनवण्यात येत आहे.

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना महापालिकेने आरोग्य सुविधा सुधारणे गरजेचे असताना चांगल्या रस्त्यावर लाखो रुपये खर्च केले जात असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. आरोग्य सुविधा तोकडी पडत असल्याने दररोज शेकडो नागरिकांना आपला जीव गमाववा लागत आहे. आपेक्षित लसीकरण होताना दिसत नाही. पुणेकरांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यापेक्षा महापालिका प्रशासन गरज नसताना चांगल्या रस्त्यावर लाखोंची उधळपट्टी करताना दिसत आहे.

हेही वाचा: खुशखबर! SBI चं होम लोन झालं स्वस्त

नाव न छापण्याच्या अटीवर नागरिकाने सांगितले की, " गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन महाविद्यालय) रस्ता चांगला असताना देखील गरज नसताना पुन्हा नवीन बनवन्याचे काम चालू आहे.कोरोनाच्या संकटात लस खरेदी साठी, आरोग्य सुविधा पुणेकरांना देण्यासाठी पैसे नाहीत असं प्रशासन म्हणतं मग इथं पैसे कसे खर्च केले जातात? ज्या ठिकाणी खराब रस्ते आहेत त्या ठिकाणी काम केले तर ठीक आहे". प्रतिक्रिया व्यक्त केली.

"रस्त्याचा वरचा (कोट) थर काढून नवीन बनवला जात आहे.निविदा काढताना पदपथ नुतनीकरणासह रस्ता डांबरीकरण करणे अशी काढली होती.रस्त्याच्या कामासाठी पन्नास ते साठ लाख रुपये खर्च होत असून सध्या हा रस्ता बनवला की पुढील पाच ते सहा वर्षे बनवण्याची गरज पडणार नाही".

-दिनकर गोजारे, कार्यकारी, अभियंता महापालिका