shivajirao adhalrao patil, atin agarwal and dilip walse patil
sakal
मंचर - आदर्श कुरवंडी (ता. आंबेगाव) गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ऑटोमेक (इंडिया) प्रा. लि. कंपनीच्या सी. एस. आर. निधीतून ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने तयार केलेल्या आराखड्यानुसार जलसंधारण व फळबाग लागवडीच्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला.या उपक्रमांतर्गत एक हेक्टर क्षेत्रात कोलंबस जातीचे नारळ, कालीपत्ती चिकू लागवड करण्यात येणार आहे. दरवर्षी गावाला १० लाख रुपये शाश्वत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.