nira river dam dry
sakal
नीरा नरसिंहपूर - नीरा नदीला पुराचे पाणी वाहून गेल्यानंतर नदीवरील बंधाऱ्यांना ढापे न टाकल्यामुळे इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. नदीवरील जवळपास सर्वच बंधारे कोरडे पडले आहेत.
पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावेत तसेच वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडून बंधारे भरून घ्यावेत, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.