Water Cut Issue : पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार; जलसंपदा विभागाचे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेला पत्र

भारतीय हवामान खात्याने यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याची शक्यता वर्तविली आहे.
Water Cut

Water Cut

esakal
Updated on

पुणे - भारतीय हवामान खात्याने यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन, तो ३१ जुलैपर्यंत कशा प्रकारे पुरविता येईल, याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे दरमहाच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्क्यांनी कपात करावी, अशी सूचना जलसंपदा विभागाने पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) पत्र पाठवून केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com