esakal | बारामतीचा बळीराजा सुखावला, शिवारात फिरलं कालव्याचं पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

nira canal

नीरा खोऱ्यातील भाटघर, वीर आणि नीरा देवघर या धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने सर्वांचीच चिंता मिटली आहे. पावसाने मागील 10 दिवसांपासून उघडीप दिली आहे. अशा स्थितीत माळेगाव, पणदरे भागातील लाभधारक शेतकऱ्यांनी ऊस, चारा पिकांसाठी पाण्याची मागणी केली होती.

बारामतीचा बळीराजा सुखावला, शिवारात फिरलं कालव्याचं पाणी

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव (पुणे) : जलसंपदा खात्याने खरीप हंगामाचे पहिले आवर्तन डोळ्यासमोर ठेवत नीरा डावा कालव्याद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यासाठी कालव्यात प्रशासनाने मंगळवारी (ता. 1) चारशे क्‍यूसेकने (निम्मा विसर्ग) पाणी सोडले. मागणीनुसार सुरवातीला पणदरे पाटबंधारे उपविभागातील 18, 19, 22 आणि 24 फाट्यांद्वारे (वितरिका) शेती सिंचनसाठी विसर्ग सुरू झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रवीण घोरपडे यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नीरा खोऱ्यातील भाटघर, वीर आणि नीरा देवघर या धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने सर्वांचीच चिंता मिटली आहे. पावसाने मागील 10 दिवसांपासून उघडीप दिली आहे. अशा स्थितीत माळेगाव, पणदरे भागातील लाभधारक शेतकऱ्यांनी ऊस, चारा पिकांसाठी पाण्याची मागणी केली होती. पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावांची पातळीही खाली गेली होती. ही स्थिती डोळ्यासमोर ठेवून जलसंपदा खात्याने नीरा डावा कालव्याद्वारे चारशे क्‍यूसेक पाणी सोडले आहे. त्यानुसार माळेगाव, पणदरे भागात खरीप हंगामातील पहिले आवर्तन सुरू झाल्याचे सांगण्यात आले. 

पुणे जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटेना

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाण्याची देण्याचे धोरण सध्यातरी अवलंबिले आहे. पिण्याचे पाणी वगळता वडगाव निंबाळकर भागात पाण्याची सध्या तरी मागणी नसल्याचे सांगण्यात येते. तीच स्थिती इंदापूर तालुक्‍यातील सणसर भागात आहे. दरम्यान, बारामती शहरात नीरा डावा कालव्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. हे कामे वेळेत व दर्जेदार होण्यासाठी जलसंपदा खात्याने कंबर कसली आहे. 
 
साठवण तलाव भरणार 
पणदरे पाटबंधारे उपविभागात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र येते. त्यामुळे 18, 19, 22 आणि 24 फाट्यांतर्गत मुख्यत्वे करून उसाचे क्षेत्र मोठे आहे. चारा पिकेही आहेत. तसेच माळेगाव, पणदरे, नीरावागज, मळद, डोर्लेवाडी, मेखळी आदी लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी गावे आहेत. तेथे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, या उद्देशाने नीरा डावा कालव्याद्वारे सोडलेले आवर्तन साठवण तलाव भरण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रवीण घोरपडे यांनी दिली.