Water Scarcity
esakal
पुणे - पाणीटंचाई असलेल्या जिल्ह्यातील गावांमध्ये नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी आरोग्य विभागाने पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. टँकरमध्ये पाणी भरले जाते त्या ठिकाणापासून ते गावात नागरिकांना पाणी वितरित करण्याच्या ठिकाणापर्यंत नमुने तपासले जाणार आहेत. तसेच पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याचीही तपासणी केली जाणार आहे.